Dhananjay munde: धनजंय मुंडेंचा घोडा पाहण्यासाठी गर्दी; माळेगावच्या जत्रेत भाव खाऊन गेला धनुभाऊंचा 'बादल'
दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या यात्रेत सध्या नागरिक व भाविक गर्दी करत आहेत. या यात्रेतील प्राण्यांचे बाजारही फुलले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयेथील यात्रेत दोन दिवसांपूर्वी आलेल्या उंटांच्या बाजाराने सगळ्याचे लक्ष वेधले होते, या बाजारातून अनेकांनी उंटींची खरेदी व विक्री केल्याचं दिसून आलं. त्यांतर, आता येथील घोडेबाजाराला सुरुवात झालीय.
माळेगावच्या यात्रेत आता घोडेबाजाराला सुरुवात झाली असून राजकीय नेत्यांचे घोडे देखील या माळेगावच्या यात्रेमध्ये दाखल झाली आहेत.
माळेगाव मध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या घोड्याजवळ अश्वप्रेमींची चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहे. बादल असे या घोड्याचे नाव असून त्याचे वय 7 वर्ष आहे.
धनंजय मुंडे यांचे वडील स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे यांनी माळेगावच्या यात्रेमध्ये अश्व आणण्याची परंपरा सुरू केली होती, ती परंपरा धनंजय मुंडे यांनी आतापर्यंत सुरू ठेवली असल्याचं त्यांच्या स्वकियांकडून सांगण्यात आलं आहे.
माळेगावच्या यात्रेमध्ये आलेला करड्या रंगाचा उंचा पुरा धनंजय मुंडे यांचा बादल पाहण्यासाठी नागरिकांची व यात्रेतील अश्वप्रेमींची गर्दी दिसून येत आहे.
दरम्यान, त्वचेच्या अनेक आजारांवर गुणकारी असलेली लोकराची घोंगडी खरेदी करण्यासाठीही माळेगांवच्या यात्रेत नागरिकांनी गर्दी केलीय.
या पारंपारिक घोंगडीमुळे थंडीपासून बचाव तर होतोच त्यासोबतच त्वचेच्या आजारांपासून संरक्षण होते असा अनुभव आहे. त्यामुळे माळेगांवच्या यात्रेत राज्यातील कानोकोपऱ्यातून घोंगडीचे विक्रेते दाखल झाले आहेत.