Nagpur Voilance: नागपूरात पोलीस महिलेचे वस्त्र काढण्याचा प्रयत्न, बाजूलाही खेचली; शूरवीर महिला जमावातून निसटली!

नागपूरच्या चिटणीस पार्क ते सीए रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर हिंसा सुरू असताना एक लाजिरवाणी घटनाही घडली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महिला पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना अंधाराचा फायदा घेत जमावाने त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही माथेफिरूंनी पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याची वर्दी खेचण्याचे प्रयत्न केला.

नागपूरच्या गणेश पेठ पोलीस स्थानकामध्ये असे लाजिरवाणी कृत्य करणाऱ्या जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच ठिकाणी असलेल्या इतर महिला पोलिसांनाही जमावातून शिवीगाळ करण्यात आली, तसंच अश्लील शेरेबाजीही करण्यात आली.
महिला पोलिसांच्या विनयभंगाचा मुद्दा सध्या मुंबईत सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील गाजला.
नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी विधानसभा सभागृहात धक्कादायक माहिती दिली.
नागपूरात जमावाकडून एका महिला पोलीसचे वस्त्र काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, असं प्रवीण दटके म्हणाले.
महिला पोलीस कर्मचाऱ्याला जमावाकडून बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. महिला पोलीस शूरवीर होती, ती हल्ल्यातून बाहेर पडली, असं प्रवीण दटके म्हणाले.
संबंधित घटनेचं सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करा, अशी मागणी देखील आमदार प्रवीण दटके यांनी केली आहे.