Maharashtra Assembly Winter Session 2023 : तृतीयपंथीयांनी विधानभवनाच्या मुख्य गेटसमोर घातला गोंधळ; समांतर आरक्षणाची केली मागणी
राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू असून या अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. या अधिवेशन दरम्यान विविध मागण्या घेऊन असंख्य मोर्चे-आंदोलन विधान भवनावर धडकत असतात.आपली मागणी पूर्ण व्हावी अशीच सर्वसामान्य आंदोलकांची अपेक्षा असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज या अधिवेशनाचा चौथा दिवशी एका आंदोलनामुळे परिसरात काही वेळ गोंधळ झाल्याचे बघायला मिळाले.तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्यासाठी विधानभवनाच्या मुख्य गेटसमोर गोंधळ घातला.
आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटून आमची दुरवस्था सांगायची आहे, असे सांगत त्यांनी विधानभवनाच्या मुख्य गेटमधून आत शिरण्याच्या प्रयत्न केला. मात्र गेटवरील सुरक्षा रक्षकांनी त्यानं अडवत त्यांची समजूत काढली.
तृतीयपंथी हक्क व संरक्षण विधेयक 2019 व नालसा निकाल 2014 अन्वये पारलिंगी (तृतीयापंथी) समुदायाला संधीची समानता या संविधानिक मुल्यानुसार सन्मानाने जगणे यासाठी राज्य शासनाने संधी उपलब्ध करून द्यावी व तशी तरतूद करावी, अशी मागणी या आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.
मुंबईत दोन वेळा निदर्शने केली, मात्र सरकार त्याकडे लक्ष देत नसल्याचे आंदोलकांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचेही सामाजिक न्याय मंत्रालय आहे, त्यामुळे त्यांनी यासंदर्भात आमच्याशी बोलून मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्या समजून घ्याव्यात, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे या आंदोलकांचे म्हणने आहे.
तृतीयपंथीना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यात यावे, त्यांना शिक्षण घेताना शिष्यवृत्ती देण्यात यावी, शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
वसतिगृहात राहण्याची व भोजनाची व्यवस्था सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात यावी आणि मासिक शैक्षणिक भत्ता देण्यात यावा, अश्या आशयाच्या मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.
तसेच आम्हाला 5 हजार रुपये देण्यात यावेत, उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार्या तृतीय जातीच्या व्यक्तींना विशेष आर्थिक मदत देण्यात यावी, त्यांना घरकुल योजनेंतर्गत लाभ देण्यात यावा, आदी मागण्या घेऊन ते विधानभवनावर येण्याचा प्रयत्न करत होते.
या आंदोलकांचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आले आहे.मात्र आम्हाला आत सोडून आम्हाला चर्चा करू द्यावी अशी या आंदोलकांची आग्रही मागणी होती. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना आत न सोडल्याने या परिसरात काहीकाळ गोंधळ बघायला मिळाला