Nagpur Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'वंदे भारत एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा; स्वत: तिकीट काढून मेट्रोने केला प्रवास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरात समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पार पडलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूर ते बिलासपूर या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.
समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी (Nagpur - Shirdi) या पहिल्या टप्प्यातील प्रवासी वाहतुकीचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपुरात झालं आहे.
पंतप्रधानांचं नागपूर विमानतळावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वागत केलं.
पंतप्रधान मोदी नागपूर मेट्रोच्या ( Nagpur Metro) झिरो माइल्स (Zero Miles Freedom Park) स्टेशनवर पोहोचले. तेथे त्यांनी फ्रिडम पार्कची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी झिरो माइल्स ते खापरी असा मेट्रो प्रवास केला.
विशेष म्हणजे त्यांनी स्वतः तिकीट काढलं. या प्रवासात त्यांनी विद्यार्थी, दिव्यांग बांधव आणि इतर नागरिकांशी चर्चा केली.
समृद्धी महामार्गाने नागपूर ते मुंबई हे 701 किलोमीटर अंतर केवळ 8 तासांत पूर्ण करता येणार आहे.
यातील 520 किमीचा नागपूर ते शिर्डी मार्ग पूर्णपणे तयार झालेला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र या क्षणाची वाट पाहत होता. कमी वेळेत नागपूर ते मुंबईचा प्रवास घडवणारा हा महामार्ग खऱ्या अर्थाने प्रवाशांना समृद्ध करणारा आहे.