Oxygen Bird Park : गडकरींचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपुरातील ऑक्सिजन बर्ड पार्कचे लोकार्पण होणार, पाहा फोटो
नागपुरातील ऑक्सिजन बर्ड पार्क हा विशेष पार्क भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुढाकारातून नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर ऑक्सिजन बर्ड पार्क साकारण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकूण 14.32 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प जवळपास 20 एकरमध्ये साकारण्यात आला आहे.
याठिकाणी केवळ पक्ष्यांसाठी विशिष्ट आणि पक्ष्यांच्या आवडीच्या फळझाडांची लागवड करण्यात आली आहे.
या उद्यानाचे महत्त्व केवळ ऑक्सिजन (प्राणवायू) देणारा परिसर एवढेच नाही तर पक्ष्यांच्या विविध प्रजातींसाठी हा परिसर आश्रयस्थान म्हणून उपयुक्त ठरणार आहे.
विशेष म्हणजे 8104 प्रकारच्या वनस्पतींसह ऑक्सिजन पार्क विकसित करण्यात आला आहे.
या प्रकल्पात त्या भागातील नैसर्गिक तळ्यांनाही त्याच स्वरूपात समाविष्ट करून घेण्यात आले आहे.
या ऑक्सिजन बर्ड पार्क मध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी फूड कोर्ट, प्रसाधनगृहे, चालण्याचे मार्ग, जॉगिंग आणि सायकलिंग ट्रॅक आहे.
तसेच वॉचटॉवर, ॲम्फीथिएटर प्लॅटफॉर्म आणि मुलांसाठी विशेष क्रीडा क्षेत्र यासह विविध प्रकारच्या सुविधा आहेत.
प्रवेशद्वारावर आकर्षक आर्किटेक्चरल डिझाईनचे आहे. विशेष म्हणजे हे उद्यान विविध प्रकारची फळे देणाऱ्या वनस्पतींनी समृद्ध आहे.
जांभळे, आंबा, पेरू, बेल, चिंच, अंजीर, खिरणी, पिंपळ, सीताफळ, आवळा ही झाडे फक्त पक्ष्यांसाठी या उद्यानात लावण्यात आली आहे.