Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur News: नागपूर-धापेवाडामधील चंद्रभागा नदीपात्रात आढळली पुरातन विहीर, शेकडो वर्षांपूर्वी विहिरीत विठ्ठलमूर्ती सापडल्याची आख्यायिका
नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूर जिल्ह्यातील धापेवाडामध्ये विठ्ठल मंदिराजवळ वाहणाऱ्या चंद्रभागा नदी पात्रात एक अत्यंत पुरातन विहीर आढळली आहे.
धापेवाडा येथील विठ्ठल मंदिरातील विठ्ठल-रखुमाईची मूर्ती शेकडो वर्षांपूर्वी एका विहिरीत सापडल्याची आख्यायिका आहे.
त्यामुळे ज्या विहिरीतून साडेतीनशे वर्षांपूर्वी विठ्ठल रखुमाईची स्वयंभू मूर्ती सापडली होती, हीच ती विहीर का? असा प्रश्न भाविकांमध्ये निर्माण झाला
त्यामुळे नदीपात्रात सापडलेली ही विहीर सध्या भाविकांसाठी कुतूहलाचा आणि श्रद्धेचा विषय बनली आहे
दरम्यान मंदिर व्यवस्थापन समितीनेही आषाढी एकादशीनंतर इतिहास संशोधक आणि पुरातत्त्व तज्ज्ञांना बोलावून या माहितीचा उलगडा करण्याचे ठरवलंय
नुकतच नदीपात्राचे खोलीकरण करत असताना एका ठिकाणी जेसीबी अडकला
तेव्हा सावधगिरीने खोदकाम केल्यावर नदीपात्राच्या आत खोल पुरातन विहीर आढळून आली आहे.
नदीपात्रात आढळलेली विहिर पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहे