Nagpur : नागपुरात अवतरली शिवसृष्टी, किल्लेदारांनी जागवला गडकिल्ल्यांचा इतिहास
छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकिल्ले यांचे नाते अतूट आहे. या दोन गोष्टीतील अद्वैत समजावून घेतले तरच शिवचरित्र्याच्या मर्मात शिरता येतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिवाळी निमिती अशाच गड किल्ल्यांची प्रतिकृती साकारून आपल्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देण्याची फार जुनी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे.
याच अनुषंगाने नागपूरात गडकिल्ल्यांच्या रूपाने शिवसृष्टी अवतरली आहे.
शहरातील विविध भागात हुबेहूब किल्ले प्रतिकृती सकारण्यात आल्या आहेत.
कुठे भव्य रायगड, राजगड, कुलाबा, शिवनेरी, प्रतापगड इत्यादी किल्ल्यांची मनमोहक आणि इतिहासाची पाने उलगाडणारी ही दुर्ग प्रतिकृती ठरत आहे.
विशेष बाब म्हणजे या दुर्ग प्रतिकृती सकारण्यात सर्व वयोगटातील किल्लेदारांचा समावेश आहे.
काळाच्या आणि प्रगतीच्या ओघात मागे पडत चलेली आपली ही गौरवशाली परंपरा या किल्लेदारांच्या वतीने मात्र अभिमानाने जोपासली जात आहे.