Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur News : इंधनसाठा मुबलक! तरीही नागपुरात अफवांमुळे पेट्रोलपंपावर लांबच लांब रांगा; जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन
केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्यातील घातलेल्या जाचक अटींच्या निषेधार्थ पुकारलेल्या संपामुळे नागपुरातील पेट्रोल पंपानवर काल रात्रीपासून नागरिकांची एकच झुंबड केल्याचे बघायला मिळाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशहरात पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पेट्रोल व गॅस पुरवठा करणाऱ्या सर्व प्रमुख कंपन्या, पेट्रोल डिझेल आणि गॅस डिलर असोशिएशनचे नागपूर जिल्ह्याचे प्रतिनिधींची बैठक घेतली.
या बैठकीच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यामध्ये सर्व पेट्रोल पंपावर पुरेशा प्रमाणात पेट्रोल, डीझेल आणि गॅसचा साठा उपलब्ध आहे.याशिवाय पेट्रोल पंपांना पुरवठा करणाऱ्या डेपोमध्ये मुबलक इंधनसाठा उपलब्ध आहे. गरज पडल्यास पोलीस संरक्षणात पेट्रोल पुरवण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी इंधन संपल्याच्या अफवावर विश्वास ठेवू नये, लवकरच परिस्थिती सुधारेल. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल रात्रीपासूनच नागपुरातील पेट्रोल पंपांबाहेर पट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, आज सकाळपासूनही पेट्रोल पंपांमधील इंधनाचा साठा पूर्णपणे ठप्प झाला आहे.
त्यामुळे शहरातील अनेक पेट्रोल पंप आज बंद असल्याचे चित्र बघायला मिळाले. या संपामुळे चकरमान्यांचे हाल होत असून नववर्षांच्या सुरवातीलाच मनस्ताप सहन करावा लागत असल्याची भावना उमटतांना दिसत आहे.
काल रात्री पासून शहरातील पेट्रोल पंपावर लोकांनी एकच झुंबड केल्याचे बघायला मिळाले.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी माध्यमांसाठी एक व्हिडिओ प्रसारित करत नागरिकांनी इंधन संपल्याच्या अफवावर विश्वास ठेवू नये, लवकरच परिस्थिती सुधारेल. असे आवाहन केले आहे.
शहरातील अनेक पेट्रोल बंद असून पुरवठा होताच पेट्रोल वितरित केले जाईल असे संगण्यात येत आहे.
अफवांमुळे शहरातील पेट्रोल पंपावर काल रात्री नागरिकांनी एकदम गर्दी केल्याने पेट्रोलपंप वरील साठा संपला आहे.
त्यामुळे शहरातील अनेक पेट्रोलपंप बंद असल्याचे चित्र आहे.