Nagpur Bird Flu: नागपूरमध्ये बर्ड फ्लूचा धोका, पालिकेच्या सर्व्हेला सुरुवात

नागपुरच्या ताजबाज परिसरात कोंबड्यांना बर्ड फ्लू ची लागण झाल्याचे पुढे आले त्यामुळे त्या भागातील बाधित क्षेत्रात आरोग्य विभाकडून घरांचे सर्वेक्षण सुरु
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मनपाच्या आरोग्य विभागाकडून आठ हजार घरांचे सर्वेक्षण करत 26 हजार 927 जणांची प्रकृतीची विचारपूस केली आहे. यात 141 जणांमध्ये इंल्युएन्झासदृश आजाराचे लक्षणे आढळून आली आहेत.

यापैकी 14 रुग्णांमध्ये गंभीर स्वरूपाचे लक्षण दिसून आल्यानं त्यांचे नमुने नागपूरच्या एम्समध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
बर्ड फ्लूचा वाढता धोका लक्षात घेऊन या भागातील 3 हजार 54 कोंबडी नष्ट करण्यात आल्या होत्या. ताजबाग येथील यासीन प्लॉट परिसरात तीन कोंबड्यांचा मृत्यू बर्डफ्लू मुळे झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून परिसरातील 3 हजार 54 कोंबड्या नियमानुसार मारून जमिनीत पुरल्या होत्या. तर त्यांचे एक हजार किलोपेक्षा जास्त खाद्यही नष्ट केले होते. बर्ड फ्लुमुळे मृत्यू पावलेल्या कोंबड्यांच्या संपर्कात आलेल्यांना Tamiflu औषध देण्यात आले आहे.
ताजबाग परिसरातील यासीन प्लॉट भागात एका चिकन सेंटर मधील तीन कोंबड्यांचा 31 जानेवारी रोजी अचानक मृत्यू झाला होता. त्यानंतर बर्ड फ्लूच्या संशयाने पशुसंवर्धन विभागाने त्यांचे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते.
त्यानंतर नियमानुसार पशुसंवर्धन विभागाने यासीन प्लॉटच्या अवतीभवतीचा एक किलोमीटर चा परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केला होता. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने बर्ड फ्लू च्या नियमानुसार त्या परिसरातील 3 हजार 54 कोंबड्या मारल्या होत्या.
नागपूरमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याने सामान्य नागरिक आणि पोल्ट्री व्यावसायिकांची चिंता वाढली आहे.