Diwali : सजावटीच्या साहित्याने नागपूरची बाजारपेठ सजली, दिवाळी खरेदीसाठी चांगला उत्साह
दिवे, आकाश कंदीलसह यंदा बाजारपेठेत मातीचे सुंदर फ्लॉवर पॉट आणि आकर्षक मुर्तीलाही यंदा चांगली पसंती ग्राककांडकून मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपारंपारिक मातीच्या दिव्यांची जागा यंदा डेकोरेटिव्ह फॅन्सी दिव्यांनी घेतली असून यात विविध आकार या दिव्यांना देण्यात आला आहे.
आकाश कंदीलसोबतच यावर्षी मातीच्या घंटीचे झूमर बाजारपेठेत उपलब्ध आहेत. याला ग्राहकांकडून चांगली पसंती मिळत आहे.
झूमरमधील घंटीच्या संख्येवरुन या झूमरचे दर ठरतात. याची सुरुवात 180 रुपयांपासून पुढे उपलब्ध आहे.
यंदाही बाजारत 10 रुपयांपासून रांगोळीचे पॅकेट उपलब्ध आहेत. मात्र यावर्षी पॅकेटचे वजन कमी आहे.
मातीच्या 'शो पिस'च्या मूर्तीचीही मागणी यंदा वाढली आहे. यात लक्ष्मी मूर्तीसह विविध आकर्षक मूर्ती उपलब्ध आहेत.
सजावटीच्या वस्तूंसह धूप, अगरबत्ती, अत्तर आदींची दुकानेही इतवारी परिसरात सज्ज आहेत.
पीओपीच्या मूर्तींवर बंदी असल्याने मातीने तयार केलेल्या लक्ष्मी मूर्तीही यंदा बाजारात खरेदी करणाऱ्यांना आकर्षित करीत आहे.
घरांवर आणि मुख्य प्रवेश द्वारावर लावण्यासाठी आर्टिफिशियल फुलांचे तोरणलाही ग्राहकांकडून पसंती दिली जात आहे.
कच्च्या मालाचे वाढलेले दर आणि वाढलेली मजूरी यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत 20 टक्के दरवाढ यावर्षी झाली आहे.
मातीने तयार करण्यात आलेल्या झूमरमध्येही विविध प्रकार उपलब्ध असल्याने ग्राहकांसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.