Congress Foundation Day : 103 वर्षानंतर काँग्रेसच्या स्थापना दिनाची सभा आज नागपुरात; 'हैं तैयार हम' महारॅलीची जय्यत तयारी
काँग्रेस नागपुरातून लोकसभेच्या प्रचाराचं बिगुल फुंकणार; 28 डिसेंबरच्या काँग्रेस महारॅलीची जय्यत तयारी सुरू
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूरच्या दिघोरी नाका, उमरेड रोड येथील 40 एकरांच्या मैदानावर या महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
103 वर्षानंतर काँग्रेसच्या स्थापना दिनाची सभा नागपुरात होत असल्यामुळे विदर्भासह देशभरातील काँग्रेस पक्षाचे नेते या महारॅली मध्ये उपस्थित राहणार आहे.
काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात होत असलेल्या या महारॅलीला 'है तय्यार हम'असे नाव देण्यात आले आहे. तर, ज्या मैदानात ही सभा होते आहे त्या सभा स्थळाला 'भारत जोडो मैदान'असं नाव देण्यात आलंय. आज 28 डिसेंबरला दुपारी 2 वाजता दिघोरी येथे आयोजित महारॅलीला मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंकागांधी इत्यादिसह काँग्रेसचे देशभरातील नेते आणि लाखो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.
लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) बिगुल फुंकण्यासाठी दीक्षाभूमी व संघभूमी असलेल्या उपराजधानीत गांधी कुटुंबीय प्रथमच एका व्यासपीठावर येणार आहे.
नागपूर हे देशातील मध्यवर्ती ठिकाण आहे. नागपूरमधूनच १९५९ मध्ये इंदिराजी गांधी यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याची घोषणा केली गेली होती. अशा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या नागपूर शहरात काँग्रेसचा १३८ वा स्थापना दिवस साजरा होत आहे.
है तैयार हम' महारॅलीमुळे महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व आनंद आहे.या सभेची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. या सभास्थळी सकाळपासूनच कार्यकर्ते गर्दी करू लागले आहे.
रॅलीच्या आयोजनासाठी राज्यभरातील काँग्रेस नेते नागपुरात मागील दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. आज येणाऱ्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या स्वागतासाठी नागपूर एअरपोर्ट परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे.
आज नागपुरात होणाऱ्या काँग्रेस पक्षाची महारॅली कडे सऱ्यांचेच लक्ष लागले आहे. या महा रॅलीतून पक्षाला नवी दिशा मिळेल आणि पक्ष उभारी घेत आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मुसंडी मारून वर जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
विदर्भाच्या भूमीने नेहमीच काँग्रेसला साथ दिली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची दीक्षाभूमी आणि प्रभू श्रीरामाचा रामटेक या पावनभूमीतून आशीर्वाद घेऊन काँग्रेस नेतृत्व देशातून भाजप सरकारला उलथवून लावेल असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.