In Pics : उद्या समारोप, आजच पाहून घ्या इंडियन सायन्स कॉंग्रेसमधील प्रदर्शन
मुलांमधील संशोधक वृत्तींना चालना देण्यासाठी पालकही मुलांना घेऊन नागपूरमधील इंडियन सायन्स कॉंग्रेसला भेट देत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशाळांसह महाविद्यालयातील विद्यार्थीही आपल्या शिक्षकांसोबत प्रदर्शनाला भेट देत असून विविध संशोधन कार्याबद्दल माहिती जाणून घेत आहेत.
येथे उपलब्ध असलेल्या विविध स्टॉल्सवर कर्मशिअल केलेले अनेक संशोधनही बघायला मिळत आहे.
संस्कृतभाषा प्रचारिणी सभेच्या स्टॉलवर निवृत्त प्रोफेसर डॉ. स्मिती होटे यांनी वराह मिहीर या ब्रह्मसंहितेतील घरगुती रसायनमुक्त हेअर डाय बनवण्याच्या फॉर्म्युला सादर केला. त्यांच्या निवृत्तीपूर्वीचे हे शेवटचे संशोधन होते, हे विशेष.
निवृत्त सी एस विंचूरकर यांच्या स्टॉलवर त्रिकोणी किंवा चौकोनी पिरॉमिडमध्ये ठेवण्यात आलेल्या गोल वस्तूंची संख्या मोजण्यासंदर्भात तयार करत असलेल्या अॅपची माहिती देण्यात येत आहे.
प्रदर्शनीत 40 हजार महिलांना रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या शिर्डी येथील जनसेवा फाऊंडेशनचेही उत्पादन उपलब्ध आहेत. संस्थेत कोविडमध्ये घरातील कर्ता पुरुष गमावलेल्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
अन्न प्रक्रिया उद्योगात संशोधन करुन आपले स्वतंत्र ब्रॅन्ड निर्माण करणारेही काही स्टॉल याठिकाणी उपलब्ध आहेत.
पेट्रो केमिकल इंडस्ट्रीद्वारे करण्यात येत असलेल्या संशोधनांबद्दलही माहिती याठिकाणी उपलब्ध आहे.
स्टील इंडस्ट्रीमधून निघणाऱ्या Steel slag द्वारे कमी वजनाचे तसेच कमी खर्चिक पेव्हिंग ब्लॅकही एका स्टॉलवर उपलब्ध आहेत.
प्लाजमा क्षेत्रातील संशोधन आणि उपकरणांची माहिती येथे उपलब्ध आहे. येथे नागपूरच्या फॉरेन्सिक सायन्स इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी उपस्थितांना तंत्रज्ञानाची माहिती देत आहेत.
प्लास्टिकच्या कचऱ्यापासून तर गॅसोलिन, डिझेल आणि एरोमॅटिक हे इंधन तयार करण्यासाठी लागणाऱ्या प्रकल्पाचाही मिनिएचर याठिकाणी ठेवण्यात आला आहे.