In Pics : मुख्यमंत्र्यांनी घेतला फुटाळा येथील 'म्युझिकल फाऊंटन शो'चा आनंद
अतिशय अप्रतिम 'फाऊंटन शो' नागपुरात पाहायला मिळाला. स्व. लता मंगेशकर यांचे नाव या 'फाऊंटन शो' ला देण्याचा विशेष आनंद असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजगातील सर्वात मोठे फाऊंटन नागपुरात आहे, ही अभिमानाची बाब : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
फुटाळा येथील 'फाऊंटन शो' गॅलरीमध्ये एकत्र संगीत कारंजाचा आनंद घेण्यासाठी 4 हजार जणांच्या बसण्याची सोय करण्यात आली आहे.
35 मिनिटांच्या 'फाऊंटन शो'मध्ये चार टप्प्यात सादरीकर, फ्रान्सच्या क्रिस्टल समूहाने 94 फाऊंटन लावले आहेत.
फाऊंटनची लांबी 180 मीटर आहे. हे सर्वात लांब फाऊंटन असल्याचा दावा करण्यात येत आहे. 50 मीटर उंचीपर्यंत उडणारे कारंजे याठिकाणी आहेत.
फुटाळा येथे भविष्यात 12 माळ्याची इमारत उभारण्यात येणार असून 1100वाहन पाकिंग व्यवस्था असणार आहे. इमारतीत फूड पार्कही तयार करण्याचा सरकारचा मानस आहे.
फुटाळा येथील प्रस्तावित प्रकल्पात बाराव्या माळ्यावर फिरते रेस्टॉरंट असणार आहे. तसेच बॉटनिकल उद्यानाचा किनाऱ्यावर चौपाटीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला आहे. या ‘म्युझिकल फाऊंटन शो’ च्या माध्यमातून नागपूरचा ऐतिहासिक आलेख जगासमोर येणार आहे.
धकाधकीच्या आयुष्यात हा शो विरंगुळा देत, आयुष्यातून ताणतणाव घालवून आनंद देईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
नागपूरमधील तरुणाईचे डेस्टिनेशन असलेले फुटाळा आता जागतिक दर्जाच्या फाऊंटेनमुळेही ओळखले जावे. याच परिसरात आता विदर्भातील कला- संस्कृतीची झलक दिसावी, अशी योजना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या मार्गदर्शनात तयार झाली आहे.