Nagpur News: उपराजधानीत अवतरली अयोध्या; वयोवृद्धाने साकारली हुबेहूब राम मंदिराची प्रतिकृति
अयोध्येतील (Ayodhya) प्राणप्रतिष्ठा नेत्रदीपक सोहळा अवघ्या भारत वर्षाने अनुभवला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अवघ्या देशवासियांच्या स्वप्नातलं भव्य राम मंदिर (Ram Mandir) सत्यात अवतरलं आहे.
संपूर्ण देशवासीयांचे लक्ष लागून राहिलेला प्रभूश्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळा आज संपन्न होतो आहे.
मात्र या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक सोहळ्याला प्रत्येकालाच जाता आले असे नाही.
मात्र असे असले तरी नागपुरात अयोध्येतील राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृति साकारण्यात आली आहे.
नागपुरातील 72 वर्षीय अरुण गुल्हाने गेल्या 8 महिन्यांच्या प्रदीर्घ नेहनत आणि कलेतून राम मंदिराची प्रतिकृति तयार करण्यात आली आहे.
फोम बोर्ड, सर्जिकल ब्लेड, आणि फेविबॉन्ड इत्यादि साहित्य वापरुन हे राम मंदिर साकारले आहे.
अरुण अरुण गुल्हाने पेशाने शासकीय नोकरीतून सेवानिवृत्त आहेत. त्यानंतर त्यांनी फावल्या वेळेत आपला छंद जोपासला आहे.
प्रत्यक्ष राम मंदिरात जाऊ शकलो नाही तरी घरी केलेल्या या राम मंदिरांमुळे फार समाधान वाटत असल्याचे गुल्हाने म्हणाले.
त्यांच्या या कलेचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.