Murlidhar Mohol : मुरलीधर मोहोळांनी प्रचाराचा नारळ फोडला.
गेल्या दहा वर्षांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यासाठी जे योगदान दिले. मेट्रो, चांदणी चौक प्रकल्प, वैद्यकीय महाविद्यालय, एक हजार कोटी रुपयांचा नदी सुधार प्रकल्प, सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरणासाठी इलेक्ट्रिक बसेसची उपलब्धता आदी योजना आणि प्रकल्प पुण्याला मिळाले.( Image Credit- Murlidhar Mohol Facebook handle)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणेकर विकासाला प्राधान्य देतात. त्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचे मत पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय आणि घटक पक्षांच्या महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.( Image Credit- Murlidhar Mohol Facebook handle)
मोहोळ पुढे म्हणाले, राज्यात 2014 ते 2019 च्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात पुण्यासाठी अनेक योजना आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे सरकार पुण्याचा सर्वांगीण व समतोल विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. ( Image Credit- Murlidhar Mohol Facebook handle)
महापालिकेत पाच वर्षे भाजपची सत्ता म्हणून विकासाची कामे केली आहेत. भविष्यातील पन्नास शंभर वर्षांचे नियोजनएक व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करणे आणि आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने आम्ही पुणेकरांकडे कौल मागणार आहोत.( Image Credit- Murlidhar Mohol Facebook handle)
संपूर्ण देशवासियांनी निश्चय केला आहे नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे ठरवले आहे, त्यासाठी पुणेकरांचे एक मत मोदींना पंतप्रधान करण्यासाठी द्यायचे आहे.( Image Credit- Murlidhar Mohol Facebook handle)
उमेदवारी जाहीर होताच अनेक कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला होता. त्यानंतर मुरलीधर मोहोळांंनी दुसऱ्याच दिवशी त्यांनी ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर शहरातील थोरांच्या स्मारकांना भेटी देऊन अभिवादन केले. ( Image Credit- Murlidhar Mohol Facebook handle)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोतीबाग कार्यालय आणि माजी खासदार स्वर्गीय गिरीश बापट आणि आमदार मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानी भेट देऊन आदरांजली अर्पण केली. या सगळ्यांचा आशिर्वाद घेत मोहोळांनी प्रचाराचा नारळ फोडला.( Image Credit- Murlidhar Mohol Facebook handle)
मला खात्री आहे पुणे लोकसभामधून मोठ्या मताधिक्याने निवडून येईन, मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून पक्ष नेतृत्वाला धन्यवाद, असं म्हणत मोहोळ यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले होते. ( Image Credit- Murlidhar Mohol Facebook handle)
मुरलीधर मोहोळांनी कोरोना काळात मोठी कामगिरी बजावली. पुण्यात कोरोनाची महामारी असताना ते जनतेत उतरले आणि पुण्यातील कोरोना परिस्थिती उत्तम हाताळली. ( Image Credit- Murlidhar Mohol Facebook handle)
त्यावेळी ते महापालिकेचे महापौर होते. सोबतच भाजपच्या पक्षश्रेष्ठीसोबत दांडगा आहे. त्यांची लढत कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकर सोबत होण्याची शक्यता आहे. ( Image Credit- Murlidhar Mohol Facebook handle)