Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Yo Yo Honey Singh : हनी सिंगचे करिअर खूप चांगले चालत असताना 2014 मध्ये तो अचानक गायब झाला; पण का?
'अंग्रेजी बीट ते', 'लुंगी डान्स', ही अशी गाणी आहेत जी आजही अनेकदा पार्ट्यांमध्ये वाजताना दिसतात. या गाण्यांद्वारे देशातील सर्वात लोकप्रिय रॅपर बनलेल्या यो यो हनी सिंगने देखील लोकांच्या हृदयात स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले. (photo:yoyohoneysingh/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएक वेळ अशी होती की हनी सिंगचे रॅप लोकांच्या ओठावर होते. (photo:yoyohoneysingh/ig)
हनी सिंगने रॅप आणि हिप-हॉपला वेगळ्या पातळीवर नेले. (photo:yoyohoneysingh/ig)
देशातील प्रत्येक मुलाने यो यो हनी सिंग गुणगुणायला सुरुवात केली, पण एक क्षण असा आला की अचानक हनी सिंग इंडस्ट्रीतून गायब झाला. (photo:yoyohoneysingh/ig)
15 जानेवारी 1983 रोजी पंजाबमधील होशियारपूर येथे एका शीख कुटुंबात जन्मलेल्या हृदेश सिंहने जेव्हा रॅपर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली तेव्हा तो यो यो हनी सिंग बनला आणि हे नाव त्याच्या गाण्यांसोबतच लोकांच्या ओठावर राहिलं.(photo:yoyohoneysingh/ig)
हनी सिंगचे करिअर खूप चांगले चालले होते, पण 2014 मध्ये अचानक तो कुठेतरी गायब झाला. त्याच्याबद्दल अनेक प्रकारच्या बातम्या येऊ लागल्या.(photo:yoyohoneysingh/ig)
दारूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी तो एका पुनर्वसन केंद्रात उपचार घेत असल्याचे कुणी सांगितले, तर कुठे सुपरस्टार शाहरुख खानने सहलीदरम्यान हनी सिंगला थप्पड मारल्याचे सांगण्यात आले.(photo:yoyohoneysingh/ig)
मात्र, नंतर त्यांची पत्नी शालिनी यांनी या सर्व बातम्या अफवा असल्याचे म्हटले. तब्बल 18 महिन्यांच्या सर्व अफवांनंतर हनी सिंग अखेर मीडियासमोर आला.(photo:yoyohoneysingh/ig)
रॅपरने एका मुलाखतीत सांगितले की, हे 18 महिने त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होते. त्याने खुलासा केला होता की तो नोएडा येथील त्याच्या घरी होता आणि त्याला बायपोलर डिसऑर्डरसारख्या गंभीर आजाराने ग्रासले होते. (photo:yoyohoneysingh/ig)
या काळात त्याच्यासोबत अनेक विचित्र गोष्टी घडत होत्या. पूर्वी तो हजारो लोकांसमोर उभा असायचा, तर चार जणांना भेटायलाही त्याला भीती वाटू लागली. (photo:yoyohoneysingh/ig)
रॅपरने सांगितले की त्याची प्रकृती इतकी बिघडली होती की तो मरण्याचा विचार करू लागला, परंतु अखेरीस औषधांनी त्याला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आणि तो बरा होऊ लागला.