Yoga Day 2022 : मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा
आज 21 जून जागतिक योग दिन. या निमित्ताने मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्यासह हायकोर्टातील इतर न्यायमूर्ती, रजिस्ट्रार जनरल तसेच जेष्ठ वकिलही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
यावेळी सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेशही आवर्जून पाहिला.
आयुष मंत्रालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार देशातील सर्व उच्च न्यायालयांना अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले गेले होते.
त्यानुसार महाराष्ट्रात मुंबईसह नागपूर, औरंगाबाद आणि गोवा या खंडपीठातही अशाच प्रकारे 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात उपस्थितांना मागर्दर्शन करण्यासाठी कैवल्यधाम योगा सेंटरमधून प्रशिक्षित योगगुरूंना आमंत्रित करण्यात आले होते.