वरळी बंद! महापुरुषांबद्दलच्या अपमानास्पद वक्तव्यांविरोधात आंबेडकरवाद्यांसह इतर घटना आक्रमक
राज्यात महापुरुषांसंदर्भातील अपमानास्पद वक्तव्यांचं सत्र थांबण्याचं नावच घेईना.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकरांसाऱख्या महापुरुषांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याविरोधात आज मुंबईतील वरळी येथे बंदची हाक.
वरळीतील आंबेडकरवादी आणि इतर संघटनांनी पुकारला बंद.
वरळीतील आंबेडकरवादी आणि बहुजन महापुरुषांना मानणाऱ्या संघटना आणि छोटे पक्ष आणि वरळीकर जनता यांच्या वतीनं आज वरळी बंद पाळण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या शिंदे फडणवीस सरकार विरोधात आज बंद करण्यात येणार आहे.
वरळीतील एक दिवसीय बंद सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत करणार आहे.
वरळीतील बंदच्या पार्श्वभूमीवर वरळीकरांकडून बंदचे पोस्टर्सही सोशल मीडियावर व्हायरल केले जात असल्याची माहिती मिळत आहे.
वरळीतील बंदच्या पार्श्वभूमीवर वरळीकरांकडून बंदचे पोस्टर्सही सोशल मीडियावर व्हायरल केले जात असल्याची माहिती मिळत आहे.
वरळी परिसर हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात येतो. त्यामुळे या वरळी बंदच्या पार्श्वभूमीवर आंदोलन केल्यास आदित्य ठाकरे या आंदोलनात सहभागी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.