In Pics : व्हिस्टाडोम कोचसह मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेसची पहिली फेरी; प्रवाशांनी नदी, खोरे, धबधबे इत्यादी दृश्यांचा आनंद लुटला
एलएचबी कोचसह मुंबई- पुणे डेक्कन एक्सप्रेस विशेषची पहिली फेरी आज (26 जून) सुरू झाली. विशेष म्हणजे या मार्गावर प्रथमच व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला आहे. ज्यामुळे प्रवाशांना निसर्गरम्य सौंदर्याचा आणि अनुभवाचा आनंद लुटता आला. व्हिस्टाडोम कोचमधील सर्व 44 सीट्स आज बुक होत्या. (सर्व फोटो- सेंट्रल रेल्वे)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्मवर कोचजवळ खास सेल्फी लावलेल्या सेल्फी पॉईंटवर प्रवाशांनी सेल्फी घेतली.
या प्रसंगी प्रवाशांनी कोचच्या आतील भागाप्रमाणे दिसणारा केकही कापला.
मोठ्या खिडक्या आणि हलु शकणाऱ्या सीट्समुळे प्रवाशांना प्रवासाचा पूर्णपणे आनंद घेता आला. प्रवाशांनी मोठ्या खिडकीच्या पॅनेलमधून या निसर्गाचा आनंद लुटला आणि पावसाळ्यातील हिरवळीमुळे हा आनंद द्विगुणित झाला. या मार्गावर हा कोच सुरू केल्याबद्दल प्रवाशांनी भारतीय रेल्वेचे आभार मानले.
व्हिस्टाडोम कोचमुळे प्रवासी माथेरान टेकडी (नेरळ जवळील), सोनगीर टेकडी (पळसधारीजवळ), उल्हास नदी (जांबरूंगजवळ), उल्हास खोरे, खंडाळा, लोणावळा येथील भाग आणि दक्षिण पश्चिम घाटावरील धबधबे, बोगद्यांजवळून जाताना निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेऊ शकतील.