Versova Cylinder Blast Pics: वर्सोव्यातील सिलेंडर गोदामाला आग, सिलेंडरचे स्फोट, नागरिकांमध्ये दहशत
वर्सोवाच्या यारी रोड परिसरातील सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशामक दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत दिवसेंदिवस आगीच्या घटना वाढत चालल्या आहेत. मागील काही दिवसांपूर्वी मानखुर्द परिसरात देखील भीषण आग लागली होती.
मुंबईत सिलेंडर ब्लास्टच्या 4 दिवसात 2 मोठ्या घटना घडल्या आहेत. पहिली मिरा रोड आणि आज वर्सोवामध्ये.
एक किलोमीटर परिसरातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या घटनेत चार जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे चारही जखमी गोडाऊनमध्ये कामाला होते.
अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली आहे. या ठिकाणी सध्या कुलिंगचं काम सुरु आहे.
आता या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, आगीनंतर स्फोटाचे आवाज भयंकर होते. या आगीत आजूबाजूची काही दुकानं देखील जळून खाक झाली आहेत.
आग लागल्यानं एकामागोमाग एक असे सिलेंडरचे स्फोट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. साधारण 10.30 वाजता ही आग लागली असल्याची माहिती आहे.
सध्या आग आटोक्यात आली असली तरी आजूबाजूच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -