PHOTO: देशाचा दुश्मन याकूबच्या कबरीवर कारवाई; सजावट केल्याची बातमी आल्यानंतर संतापाची भावना
मुंबईत बॉम्बस्फोट घडवून शेकडो लोकांचे बळी घेणाऱ्या दहशतवादी याकूब मेमनच्या मुंबईतील कबरीचं सुशोभीकरण करण्यात आल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली आणि यंत्रणा खडबडून जागी झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाझाच्या बातमीची दखल घेत पोलिसांनी कबरीवर तातडीनं कारवाई केली.
याकूब मेमनच्या कबरीवर लावण्यात आलेल्या एलईडी लाईट्स पोलिसांनी काढून टाकल्या आहेत.
देशाचा दुश्मन असलेल्या याकूब मेमनच्या कबरीची सजावट केल्याची बातमी आल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला.
त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाले. माझाच्या बातमीनंतर पोलिसांनी तातडीनं दखल घेऊन दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये धाव घेतली आणि कबरीवरील एलईडी लाईट्स हटवली.
याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करून त्यावर रोषणाई करण्यात आल्याची बातमी माझानं काल दिली.
खडबडून जाग आलेल्या पोलिसांनी याकूबच्या कबरीवरच्या एलईडी लाईट्स हटवल्या आहेत.
18 मार्च 2022 रोजी कबरीवर लाईट्स लावल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आलीय.
शब ए बारातच्या दिवशी लाईट्स लावण्यात आल्याची माहिती आहे. या दिवशी लोक पूर्वजांच्या कबरीवर प्रार्थनेसाठी जातात.
त्यावेळी कबरीवर लाईट्स लावण्यात आले अशी माहिती तपासात समोर आलीय.