PHOTO : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमित शाह यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, स्नुषा आणि नातवंड होती.
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झाले.
अमित शहांसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.
मेघदूत बंगल्यावर जवळपास 200 पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजपची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.
शीघ्र कृती दल, आरएएफसह मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कायदा सुव्यवस्था सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटीलही या ठिकाणी उपस्थित होते.
अमित शाहांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर अमित शाहांनी वांद्र्यातील गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. यावेळी त्यांनी सहकुटुंब बाप्पाचं दर्शन घेतलं.
लालबागचा राजा, शेलारांच्या मतदारसंघातील गणपती , देवेंद्र फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानातील गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आता अमित शाह यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देणार आहेत.