PHOTO : शिवतीर्थावर तिथीनुसार शिवजयंतीचा उत्साह, महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
राज्यात आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज शिवाजी पार्कमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सोहळ्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी राज ठाकरे यांनी जमलेल्या सर्व मनसेच्या कार्यकर्त्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
मनसेच्या आजच्या कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण होतं ते शिवाजी पार्कवरील शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून होणारी पृष्पवृष्टी.
हेलिकॅाप्टरमधून महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या.
तिथीनुसार शिवजयंतीच्या निमित्ताने ढोलताशांच्या गजरात हा भव्यदिव्य सोहळा शिवतीर्थावर पार पडला.
तिथीनुसार आलेल्या शिवजयंतीसाठी मनसेने जय्यत तयारी केली आहे. शिवसेना याआधी तिथीनुसार शिवजयंती साजरी करत होती पण आता हिच शिवजयंती गेल्या काही वर्षापासून मनसे दणक्यात साजरी करत आहे.