Raj Thackeray: आजोबा नातवाच्या प्रेमाचं ट्युनिंग; कधी फोटोग्राफर तर कधी ड्रायव्हर, नातवाला असा वेळ देतात राज ठाकरे
मनसेच्या (MNS) वतीनं मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर 'शिवाजी पार्क दीपोत्सव' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनसेच्या शुक्रवारी पडलेल्या कार्यक्रमात राज ठाकरे आपल्या नातवासोबत दिसले.
आपल्या भाषणामध्ये नेहमीच विरोधकांचा समाचार घेणाऱ्या राज ठाकरेंच्या नातू प्रेमाची मोठी चर्चा आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे याच वर्षी काही महिन्यांपूर्वी आजोबा झाले आहेत. त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांना मुलगा झाला आहे.
किआनच्या आगमनामुळे घरात उत्साहाचं, चैतन्याचं वातावरण असल्याची भावना आजोबा राज ठाकरे यांनी याआधीही व्यक्त केली होती.
यंदा पुन्हा त्यांचं नातवावरचं प्रेम दिसून आलं आहे.
गणेशोत्सवात आजोबा राज ठाकरे आपल्या नातवासाठी फोटोग्राफरच्या भूमिकेत दिसले. तर काही दिवसापूर्वी शिवाजी पार्कवर फेरफटका मारताना दिसले.
काल नातू किआनला शिवाजी पार्कची रोषणाई दाखविण्यासाठी गाडीतून फिरवले
यावेळी सोबत अमित ठाकरे देखील उपस्थित होते.
राज ठाकरेंचं हे वेगळंच रुप सोशल मीडियावरुनही व्हायरल होत आहे.
राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार दादरमधील शिवाजी पार्कवर उपस्थित होते