पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतुकीचे तीन तेरा, कुरार ते कांदिवली वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुंबईत सध्या वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. यामुळे असंख्य मुंबईकरांना कामावर जाणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर अंधेरीकडून बोरीवलीकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. अंधेरीकडून बोरीवलीकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.
कुरार मेट्रो स्थानक ते कांदिवली समता नगर पोलीस स्टेशन दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत
पंधरा मिनिटांच्या अंतराकरता आता जवळपास एक ते सव्वा तास लागत आहे.
वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक त्रस्त झाले असून कांदिवली पश्चिम द्रुतगती महामार्गावर ब्रिज तोडून खांब टाकत असल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
सध्या या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत आहे. यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
मुंबईकडे जाणारी वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत.