IN Pics : मुंबईतील कांदिवली भागात तब्बल 400 हून अधिक गाड्या पाण्याखाली
शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी मुंबईत पाणी साचलं. मुंबईतील कांदिवली भागात तर तब्बल 400 हून अधिक गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या कांदिवलीतल्या ठाकूर कॉम्प्लेक्समधल्या बीएमसीच्या पार्किंगमधल्या 400 पेक्षा जास्त गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या. मुसळधार पावसामुळे कांदिवलीतल्या ठाकूर कॉम्प्लेक्समधल्या बीएमसीच्या पार्किंगमध्ये पाणी साचलं. त्यामुळे पार्किंगमध्ये असलेल्या 400 हून अधिक गाड्या पाण्याखाली गेल्या.
पावसाचा जोर ओसरल्यानंतर पार्किंगमधलं पाणी कमी झालं. अन् गाड्यांची झालेली दुरावस्था पाहून धक्काच बसला.
कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्सच्या पे अॅन्ड पार्कच्या जागेत शिरलेले पाणी उपसण्याचे काम सुरु आहे. पे अॅन्ड पार्कच्या जागेत शिरलेले पाणी पंप लावून उपसण्यात आलं.
पाण्यासोबत आलेली माती, कचरा, प्लास्टिक गाड्यांवर साचलं आहे. मात्र गाड्यांचंही नुकसान झालं असेल, ते पाणी ओसरल्यानंतर कळेल.
पाण्यासोबत आलेली माती, कचरा, प्लास्टिक गाड्यांवर साचलं आहे. मात्र गाड्यांचंही नुकसान झालं असेल, ते पाणी ओसरल्यानंतर कळेल.
आपल्या कशा आहेत, हे पाहण्यासाठी गाडी मालक तेथे आले होते. मात्र आपल्या गाड्यांपर्यत पोहोचण्यासाठी त्यांना छातीएवढ्या पाण्यातून वाट काढावी लागली.