Electric AC Double Decker Bus : मुंबईकरांना बेस्टकडून नवं गिफ्ट, भारतातील पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस आजपासून सेवेत
मुंबईकर नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण करणारी इलेक्ट्रिक डबल डेकर बस लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबेस्टच्या कुलाबा आगारात पहिल्या ईव्ही डबल डेकरचं पूजन करण्यात आले आहे.
या बसेस टप्प्याटप्प्याने बेस्टच्या सेवेत दाखल होणार आहेत.
पहिली नवीन डबल डेकर बस या आठवड्यापासून वांद्रे कुर्ला संकुल ते वांद्रे स्टेशनपर्यंत धावणार आहे.
त्यानंतर ही बस दक्षिण मुंबईतील काही मार्गांवरुन धावणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नरिमन पॉइंट, कुलाबा ते वरळी आणि कुर्ला ते सांताक्रुझ या मार्गांवर या बसेस धावताना दिसेल.
या बसचं किमान अंतरासाठीचं भाडं सहा रुपये असणार आहे.
संपूर्णपणे वातानुकूलित, ऐसपैस आसनव्यस्था, सीसीटीव्ही, तीन तासांच्या सिंगल चार्जमध्ये 120 किमी. प्रवासाची क्षमता ही या डबल डेकरची खास वैशिष्ट्ये आहेत.
मार्च अखेरीस 50 डबल डेकर एसी इलेक्ट्रिक बस बेस्टकडून सेवेत दाखल होणार आहेत.
एकूण 200 बसेस मुंबईकरांच्या सेवेत येणार आहेत