Mumbai News: सकल हिंदू समाजाकडून मुंबईत हिंदू जन आक्रोश मोर्चा; लव जिहाद, धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याची मागणी
लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून शिवाजी पार्क येथे आज हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलव जिहादमध्ये अडकलेल्या मुलींचे कुटुंब आणि ज्यांना फसवण्यात आलेलं आहे, अशा काही पीडिताही सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे
हिंदू धर्म, हिंदू समाज हिंदुस्थानाच्या कल्याणासाठी आणि लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी हिंदू धर्म रक्षण विराट मोर्चा आयोजित करण्यात आला आहे
लव जिहादमध्ये अडकलेल्या मुलींचे कुटुंब आणि ज्यांना फसवण्यात आलेल्या काही महिला संवाद साधणार आहेत.
सकल हिंदू समाजाच्यावतीने हा मोर्चा आयोजित केला असून लव जिहादच्या विरोधात घडणाऱ्या घटना पाहता सर्व हिंदूंनी एकत्र येण्याचे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आला आहे.
सकाळी दहा वाजता या हिंदू जन आक्रोश मोर्चाला शिवाजी पार्क येथे सुरुवात झाली आहे.
अनेक भाजपचे नेते मोर्चामध्ये सहभागी झाले आहे.
मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती सर्वधिक आहे
पोलीसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हिंदू संघटनांचे कार्यकर्ते देखील हजारोंच्या संख्येने सहभागी झाले आहेत