Mumbai Aarey : मुंबई : आरे कॉलनीमध्ये झाडांची छाटणी सुरू, वाहतुकीसाठी रस्ता बंद; पाहा फोटो
गोरेगाव चेक नाका ते मरोळ नाका या ठिकाणांना जोडणारा आरे कॉलनी मधला मुख्य मार्ग मुंबई पोलिसांनी पूर्ण बंद केला आहे. गोरेगाव चेक नाक्यावर आज सकाळपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा मार्ग बंद असल्याने आरे मार्गे पवईला जाणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. त्याच्या परिणामी आता पवईला जाण्यासाठी जेव्हीआरएल मार्गांवरून जावे लागत आहे. यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरे कॉलनीमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या वाहनांना आरे कॉलनीतील मार्ग वापरण्यास मुभा देण्यात आली आहे.
आरे कॉलनीतील रस्त्याच्या लगत असलेल्या वृक्षांची छाटणी केली जात आहे. मेट्रो कारशेडच्या प्रस्तावित जागेवरील झाडे कापली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. पर्यावरणप्रेमींमध्ये झाड तोडणीच्या कारवाईवरून नाराजी पसरली आहे.
पोलिसांकडून झाडे कापली जात असल्याचे फोटो, व्हिडिओ काढणाऱ्यांचे मोबाइल ताब्यात घेऊन त्यातील फोटो , व्हिडिओ डिलीट केले जात असल्याचा आरोप केला जात आहे.
आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर पर्यावरणप्रेमींकडून रविवारी आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिशीद्वारे जमावबंदी लागू करण्यात आली आहे.