Mumbai News: पोलीस भरतीसाठी आलेल्या राज्यभरातील विद्यार्थ्यांचा मुंबई विद्यापीठाबाहेरच मुक्काम
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbai News) अनेकजण आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी येतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र पोलीस भरतीचे स्वप्न मुंबईत घेऊन आलेल्या मुलांचे हाल सुरु आहेत.
मुंबई विद्यापीठात (Mumbai University) आज होणाऱ्या मैदानी चाचणीसाठी अनेक उमेदवार मुंबई विद्यापीठाबाहेर आले होते
यावेळी सुरक्षेचं कारण देत विद्यापीठ प्रशासनाने उमेदवारांना गेटबाहेरच अडवलं. त्यामुळे उमेदवारांना विद्यापीठाच्या गेटबाहेरच मुक्काम करावा लागला आहे.
विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये जागा द्यावी यासाठी आंबेडकर स्टुडंट असोसिएशनने विद्यापीठाशी संपर्क साधला.
मात्र विद्यापीठाने कुठलाही प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
सकाळी विद्यार्थ्यांच्या मैदानी परीक्षा आहेत मात्र विद्यापीठाने या विद्यार्थ्यांची कॅम्पसमध्ये सोय केलेली नाही.
कुठल्याही प्रकारची सोय न केल्याने विद्यार्थ्यांनी रात्र विद्यापीठाच्या गेट समोर, फुटपाथवर, पुलाखाली मुक्काम काढली.
विद्यापीठाने कोणताही प्रतिसाद न दिल्याने आज देशाचे भवितव्य रस्त्यावर झोपल्याचे पाहायला मिळाले आहे.
पोलीस बनायचं स्वप्न उराशी बाळगून उमेदवार मुंबईत दाखल होतात. परंतु सोयी सुविधांच्या अभावी अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो.