गिरगावात साकारले गड-किल्ले, शिवकालीन शस्त्र व नाण्याचं प्रदर्शन
गिरगावात साकारले गड-किल्ले, शिवकालीन शस्त्र व नाण्याचं प्रदर्शन
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगिरगाव प्रबोधन' आयोजित किल्ले बांधणी स्पर्धा व प्रदर्शन हा उपक्रम पाच ते सहा नोव्हेंबर 2022 रोजी गिरगावातील शारदा सदन शाळेत पार पडला.
या उपक्रमाचे यंदाचे सहावे वर्ष होते
किल्ले प्रदर्शनाचे मुख्य आकर्षक ठरले ते म्हणजे साकारलेले प्रतापगड , नळ दुर्ग , रायगड तसेच वाळू ने साकारले 10 फुटी विजयदुर्ग.
अशा 15 हुन अधिक गडकिल्यांची हुबेहूब प्रतिकृर्ती या प्रदर्शनातुन साकारण्यात आली. बालकलाकारांनी पण या स्पर्धेत खुप मोठया संख्येने सहभाग घेतला होता.
तसेच शिवकालीन शस्त्र व नाणी यांचे प्रदर्शन पाहायला मिळाले त्यात तलांवर, भाले, ढाल, खंजीर, बीचवा, वाघनख असे विविध शस्त्र आणि शिवकालीन भारतीय राजाचे नाणी येथे पाहायला मिळाली
या दोन दिवसीय प्रदर्शनाला मुबंई व उपनगरातून फार मोठ्या संख्येने प्रेक्षकानीं हजेरी लावली.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणुन इतिहास संशोधक राजेंद्र चेउलकर ( राजू मास्तर) व महेश पुरव मुबई कला विद्यायलचे प्रिंसिपल तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
गिरगाव प्रबोधन ही गिरगावातील तरुणांनी एकत्रित येउन स्थापित केलेली संस्था आहे,ज्याचे उद्दिष्ट हे समाजात संस्कृतीचे जतन करत त्यासोबतच खेळ,कला व विद्या या गुणांना वाव देणे हा आहे.
गिरगाव प्रबोधन' आयोजित किल्ले बांधणी स्पर्धा व प्रदर्शन हा उपक्रम गिरगावातील शारदा सदन शाळेत पार पडला.