Mumbai fish market:जाणून घ्या मुंबईतील हे ५ फिश मार्केट !
एवढंच नाही तर, डॉक्टर देखील मासे खाण्याचा सल्ला देत असतात. मासे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. (Photo credit: Unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवाय अनेकांना याची चव विशेष आवडते. मुंबईमध्ये अनेक प्रकारचे मासे बाजारात विकण्यासाठी आहे. पण काही बाजारांमध्ये मासे फार महाग मिळतात. (Photo credit: Unsplash)
पण मुंबईत काही असे ‘फिश मार्केट’ आहेत जेथे फार कमी रुपयांमध्ये मासे मिळतात. तर आज जाणून घेवू मुंबईतील सर्वात स्वस्त ‘फिश मार्केट’बद्दल (Photo credit: Unsplash)
भाऊचा धक्का: मुंबईतील सर्वात मोठं फिश मार्केट आहे. या बाजारात अनेक मासे प्रेमी मासे खरेदी करण्यासाठी येतात. भाऊचा धक्का या बाजारात ग्राहकांना परवडणाऱ्या दरात मासे खरेदी करता येतात. या ठिकाणी खवय्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मासे सहजतेने आणि स्वस्त दरात उपलब्ध होतात. (Photo credit: Unsplash)
ससून डॉक : सर्वात जुन्या बंदरांपैकी एक असलेला ससून डॉक सर्वात जुना आणि सर्वात मोठा फिश मार्केट आहे ससून डॉकमध्ये अनेक प्रकारचे मासे उपलब्ध असतात. याठिकाणी मासे परवडणाऱ्या दरात मिळतात. मुंबईतील एक लोकप्रिय आणि जुने फिश मार्केट म्हणून ससून डॉकची ओळख आहे. (Photo credit: Unsplash)
क्रॉफर्ड फिश मार्केट: प्रचंड जुनं आणि प्रसिद्ध फिश मार्केट आहे. या बाजारात अनेक प्रकारचे मासे मिळतात. एवढंच नाही तर, क्रॉफर्ड फिश मार्केटमध्ये माशांचे दर देखील परवडणारे असतात. या ठिकाणी मासे खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते.(Photo credit: Unsplash)
सायन फिश मार्केट : सायन मार्केट मुंबईतील एक मासळी मार्केट ज्यामध्ये खेकडे देखील खरेदीसाठी उपलब्ध आहेत. तुम्ही येथे कमी प्रमाणात मासे देखील खरेदी करू शकता. सायन मार्केटमध्ये देखील अनेक प्रकारचे मासे असतात.(Photo credit: Unsplash)
दादर फिश मार्केट : मार्केट स्टेशनच्या अगदी जवळ आहे. दादर स्टेशनजवळ मोठं मार्केट आहे. याठिकाणी फळं, भाज्या आणि फिश मार्केटमध्ये अनेक प्रकारचे मासे परवडणाऱ्या दरात असतात. रविवारी मासे खरेदी करण्यासाठी दादर फिश मार्केटमध्ये मासे प्रेमींची मोठी गर्दी जमते. (Photo credit: Unsplash)
असे हे सुप्रसिद्ध मार्केट आहे भरपूर प्रमाणात सकाळच्या दरम्यान गर्दी पाहायला मिळते (Photo credit: Unsplash)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo credit: Unsplash)