दुकानातल्या रॉकेलने केला घात; चेंबुरच्या गुप्तासेठ यांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
पहाटे 5.30 च्या दरम्यान ही आग लागली होती. या आगीमध्ये क्षणधार्त होत्याचे नव्हतं झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिद्धार्थ कॉलनीतील परिसरात 1+2 पोटमाळ्याचे असून घराला तळमजल्यावर किराणा मालाचे दुकान होते.
या दुकानात दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंसोबत या दुकानामध्ये रॉकेलचे कॅन ठेवण्यात आले होते.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, घराच्या मीटर बॉक्समध्ये शॉकसर्किटमुळे ही आग लागली आणि बघता बघता संपूर्ण घरात पसरली.
दुकानात लागलेली आग रॉकेलच्या बॅरेलमुळे जास्त भडकल्याचे आसपासच्या लोकांचे म्हणणे आहे.
आग लागल्याचे लक्षात येते छेदिराम गुप्ता व त्यांचा मुलगा धर्मदेव गुप्ता हे घराबाहेर पडले.
मात्र घरामध्ये गीतादेवी छेदिराम गुप्ता, अनिता धर्मदेव गुप्ता, विधी धर्मदेव गुप्ता, नरेंद्र धर्मदेव गुप्ता, प्रेम छेदिराम गुप्ता, मंजू प्रेम गुप्ता हे घरातच अडकून पडले. त्यामुळे सर्वजण आगीमुळे होरपळले.
आगीची माहिती मिळताच घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या पाच गाड्या व ॲम्बुलन्स पोहोचल्या होत्या.