Mumbai: मुंबईतील अंधेरी पूर्व भागात दरड कोसळली, पाच प्लॅटवर मातीचा ढिगारा
मुंबईतील अंधेरी पूर्व चकाला परिसरात रामबाग सोसायटीमध्ये दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास रामबाग सोसायटीच्या बाजूला असलेल्या डोंगरामधून सोसायटीच्या पहिला मजल्यावरील चार ते पाच फ्लॅटमध्ये डोंगराच्या ढिगारा गेला.
मध्यरात्री दोनच्या सुमारास घरांमधील सर्व नागरिक झोपेत असताना ही दरड कोसळल्याची दुर्घटना घडली. सुदैवाने या दरड दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरड दुर्घटनेमध्ये पाच ते सहा घरांचं मोठं नुकसान झालं आहे. सध्या या डोंगरामधून इमारतीवर सतत माती कोसळत आहे. यामुळं इमारतीच्या 165 घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे
दरड दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या आणि मुंबई पोलिसांचे जवान घटना स्थळावर दाखल झाले. सध्या लोकांना इमारतीच्या बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.
अंधेरी चकाला रामबाग सोसायटीत 23 वर्षे जुनी आहे. या इमारतीवर रात्री दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.
इमारतीमध्ये रहिवासी झोपेत असताना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.
इमारतीच्या बाजूला असलेल्या डोंगराचा एक भाग कोसळून इमारतीच्या भिंती तोडून दगड घरामध्ये शिरले आहेत. त्यामुळं इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पाच घरांमध्ये माती शिरली आहे.
दरड कोसळल्यामुळं इमारतीच्या 165 घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या आणि मुंबई पोलिसांचे जवान घटना स्थळावर दाखल झाले. सध्या लोकांना इमारतीच्या बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीतील दरड दुर्घटना ताजी असतानाच मुंबईतील अंधेरी पूर्व चकाला परिसरात रामबाग सोसायटीमध्ये दरड कोसळल्याची दुर्घटना