Mira Road News : रिक्षामध्येच विसरली दीड किलो चांदीची नाणी आणि 66 हजार रुपये रोख रक्कम, पोलिसांच्या तपासाला यश
काशीमिरा येथील सुदर्शन कॉम्प्लेक्समध्ये विनोदकुमार डागर हे वास्तव्यास आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाशीमिराहून बोरिवलीकडे रिक्षातून ते जात होते.
त्याचवेळी रिक्षातच त्यांच्याजवळ असलेली लाल रंगाची बॅग विसरुन गेले.
त्या बॅगेत दीड किलो चांदीची नाणी आणि 66 हजार रुपये रोख रक्कम होती.
विनोदकुमार यांनी तात्काळ काशीमिरा पोलीस ठाणे गाठले. त्यांनी तिथे बॅग हरवल्याची तक्रार नोंदवली.
काशीमिरा पोलिसांनी तात्काळ काशीमिरा ते बोरिवली कॉम्प्लेक्सपर्यंत 150 हून अधिक सीसीटीव्ही तपासले.
त्याचमाध्यमातून त्यांनी रिक्षाची देखील ओळख पटवली.
त्यानंतर रिक्षा चालकाशी संपर्क साधून, त्याच्या ऑटोमध्ये राहिलेली लाल बॅग परत मिळवली.
त्या बॅगेतील चांदीची नाणी आणि रोख रक्कम विनोदकुमार याला परत केली.
पोलिसांच्या या कामगिरीबद्दल विनोदकुमारने पोलिसांचे आभार मानले आहेत.