Nashik News : सापुतारा फेस्टिवलमध्ये डांगी कलापथकांचा डंका, फॉरेनर्सही पडले बोहाड्याच्या प्रेमात
गुजरात टुरिझम आयोजित सापुतारा फेस्टिवलमध्ये आदिवासी लोककला पथकांनी रंगमंच गाजविला. तर फॉरेनर्सही बोहाड्याच्या प्रेमात पडले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुरगाणा शहरापासून अवधे वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरील गुजरात राज्यातील सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणी दरवर्षी श्रावण महिन्यात सापुतारा फेस्टिवलचे आयोजन केले जाते.
सापुतारा फेस्टिवलच्या निमित्ताने गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या फेस्टिवलचे आयोजन केले जाते.
डांग, सुरगाणा तालुक्यातील आदिवासी लोककला, संस्कृती, परंपरा याचे प्रदर्शन या निमित्ताने गुजरात पर्यटन महामंडळाच्या वतीने केले जाते. आदिवासींची लोककला, पौराणिक संस्कृती, प्रकृती संवर्धन व जतन या गोष्टी पर्यटकांना आकर्षित करतात.
सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड येथील कणसरा माता भोवाडा कलापथक, डोल्हारे येथील भगवान बिरसा मुंडा कलापथक, श्री भुवन चिंचपाडा येथील मादोळ कलापथक या कला पथकांना निमंत्रित करण्यात आले होते.
सापुतारा फेस्टिव्हलमध्ये युगांडा, केनिया, झांबिया, मलावी, कजाकिस्तान, युक्रेन, नायजेरिया, कोंगो आदी देशातील पर्यटकांनी हजेरी लावत तारपी नृत्याचा आनंद घेतला.
आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करणे हि काळाची गरज आहे, असे प्रतिपादन गुजरात राज्याचे पर्यटन व सांस्कृतिक मंत्री पुरणेशभाई मोदी यांनी यावेळी केले.
सापुतारा फेस्टिवलच्या निमित्ताने गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या फेस्टिवलचे आयोजन केले जाते.