मुंबईत फुटबॉल स्पर्धेचं यशस्वी आयोजन
नोव्हेंबर 6 ते 8 नोव्हेंबर दरम्यान सुरू असलेल्या या फुटबॉल लीग स्पर्धेत 14 विविध शाळेतील टीम्सने सहभाग घेतला. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फुटबॉल लीगच्या सामन्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दिनेश नायर यांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं.
नायर हे फिफा वर्ल्ड कप कमिटीचे सदस्य असून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मिहीर ठक्कर सुद्धा पाहुणे होते व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीलता यांचे योगदान होते.
त्याचबरोबर या शाळेचे चेअरमन राधाकृष्ण हे सुद्धा ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित होते.
मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या मुला-मुलींनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन याचा आनंद घेतला.
विद्यार्थ्यांना फुटबॉल आणि खेळाकडे प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी शाळा प्रशासन अशा स्पर्धा राबवत आहे अशी माहिती प्राचार्य लता नायर यांनी दिली.