PHOTO : मुंबईत पावसाची नॉन स्टॉप बॅटिंग; सखल भागांत पाणीच पाणी, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन
मुंबई गेल्या पहाटेपासूनच पावसाची कोसळधार.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतल्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात वांद्रे, सांताक्रुज, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरामध्ये सध्या पावसाचा जोर वाढला आहे.
मुसळधार पावमुळं अंधेरी सबवेमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.
मागील काही तासांमध्ये मुंबई (Mumbai) , कोकण (Konkan) तसेच, राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे.
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, (IMD) येत्या 4 ते 5 दिवसांत राज्यात विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस पडेल.
दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टी भागांत कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
हवामान विभागाकडून पुढचे काही दिवस सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
विदर्भात विजांच्या कडकडाटासह तीन दिवस मुसळधार पाऊस तर मराठवाड्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
मच्छिमारांनाही पुढील 2 दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.