Mahaparinirvan Din : थँक्स आंबेडकर! चैत्यभूमीवर महामानव डॉ बाबासाहेबांना दिग्गजांकडून अभिवादन
Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din News Updates : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील दादर येथे चैत्यभूमीवर जाऊन दिग्गजांनी अभिवादन केलं.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादनं केलं
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील महामानव बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं
यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलिप वळसे पाटील, मंत्री धनंजय मुंडे, आदित्य ठाकरे, अस्लम शेख उपस्थित होते.
मुंबईच्या महापौरांनी देखील महामानवाला वंदन केलं
ही छायाचित्रं चैत्यभूमीवरील सकाळी झालेल्या कार्यक्रमाची आहेत.
मध्यरात्रीपासून शेकडो आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रांगा लावल्या आहेत. गर्दी होऊ नये तसेच कोरोना बाबतचे नियम पाळले जावेत म्हणून इथे मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.