Mahaparinirvan Din : महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार Image, WhatsApp Status द्वारे करा शेअर; महामानवाला करा विनम्र अभिवादन
भारताला प्रगतीशील आणि लोकशाहीयुक्त संविधान देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाणसाला माणूसपण दाखवणाऱ्या महामानवाला महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम!
मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्वाची, तू जगाला शिकवली व्याख्या, माणसातल्या माणुसकीची तू देव नव्हतास, तू देवदुतही नव्हतास तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास महासूर्याला विनम्र अभिवादन!
सागराचे पाणी कधी आटणार नाही, भिमाची आठवण कधी मिटणार नाही, अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी, बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन...!
ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल, त्याला लढावे लागेल, आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल, कारण ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव निश्चित आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन... विनम्र अभिवादन!
एक उत्तम कलाप्रेमी, शिक्षणप्रेमी, गुणवंत, बुद्धिमान असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन...!
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम!
महामानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि बहुजनांचे उद्धारकर्ते भारताचे भाग्य विधाते परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन…
नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञानदेवतेला, नमन त्या महापुरुषाला, नमन अशा आपल्या बाबासाहेबांना..! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
आपल्या देशासाठी आणि समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन!