ट्रॉली हलली, बाप्पा चालले, क्षणात डोळे टचकन ओले; लालबागचा राजा गावी निघाला, पाहा भावूक करणारे Photo
“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” असा जयजयकार करत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे.
लालबागच्या राजाची शेवटची आरती झाल्यानंतर गणपतीची मुर्ती ट्रॉलीवर खेचण्यात आली.
लालबागचा राजा मंडप परिसरात यावेळी भावूक वातावरण पाहायला मिळाले.
आता लालबागचा राजा मेन गेटजवळ आला आहे.
लालबागचा राजा गेटजवळ येताच 'पालखी निघाली राजाची' या गाण्यावर सर्व भक्त थिरकले.
मुंबईतील प्रसिद्ध असणाऱ्या लालबागचा राजा, मुंबईचा राजा, तेजुकायाचा गणपती, चिंचपोकळीचा चिंतामणी, काळाचौकीचा महागणपती, परळचा राजा, परळचा महाराजा या मंडळाचे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहेत.
संपूर्ण लालबाग परिसरात आता लालबागच्या राजाची मिरवणूक होईल.
लालबागच्या राजाचं उद्या पहाटे गिरगाव चौपाटीवर विसर्जन होईल.