विसर्जनासाठी चौपाटीवर जाणार आहात?; मुंबईकरांनो काळजी घ्या, समुद्रकिनाऱ्यावर दंश करणारे मासे!
लाडक्या गणरायाला आज भक्तिभावाने निरोप दिला जाणार आहे. विसर्जन निर्विघ्न पार पाडावे यासाठी मुंबई पोलिसांनी सर्व तयारी केली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी लाखोंच्या संख्येने भाविक रस्त्यावर येतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अडीच हजार वाहतूक पोलिस महत्त्वाच्या मार्गावर तैनात असणार आहेत. इस्ट- वेस्टची कनेक्टिव्हिटी सुरू राहण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर केला आहे. नवी मुंबईतून मुंबई विमानतळापर्यंत 'ग्रीन कॉरिडॉर' असणार आहे.
गणेश मूर्तीच्या विसर्जन दरम्यान रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून ट्रॅफिक पोलिसांनी महत्त्वाच्या ठिकाणी वॉच टॉवर उभारले आहेत. मात्र याचदरम्यान मुंबई महानगर पालिकेने एक महत्वाचं आाहन केलं आहे.
समुद्रकिनाऱ्यावर दंश करणारे मासे तसेच समुद्री जीवांचे अस्तित्व राज्याच्या मत्स्य विकास विभागाच्या पाहणीत आढळले आहे. त्यामुळे गणेश मूर्तीचे समुद्रात विसर्जन करताना नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
गणेशमूर्ती विसर्जनावेळी दंश करण्याची शक्यता असलेले अपायकारक मासे मत्स्य विभागाने केलेल्या 'ट्रायल नेटिंग' मध्ये मोठ्या प्रमाणात आढळले, अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहायक आयुक्तांकडून देण्यात आली.
राज्य सरकारच्या मत्स्य व्यवसाय विभागाने गिरगाव आणि दादर चौपाटी येथे अपायकारक माशांच्या अस्तित्वाची चाचपणी केली असता त्यात ढोमी, कोळंबी, स्टिंग रे (पाकट), जेली फिश, शिंगटी, ब्लू जेली फिश, घोडा मासा, छोटे रावस आदी मासे आढळले.
नेटिंगमध्ये पाकट (स्टिंग रे) हा मासा आढळला. त्याचबरोबर जेली फीश, ब्लू जेली फिश हे मासेही आढळले. त्यामुळे विसर्जनावेळी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.