Isha Ambani : ईशा अंबानी आणि पती आनंद पिरामल जुळ्या बाळांसह मुंबईत, शाही स्वागत, पाहा फोटो
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानीने 20 नोव्हेंबर रोजी जुळ्या बाळांना जन्म दिला. त्यानंतर आज ईशा अंबानी, तिचे पती आनंद पिरामल आणि बाळांना घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुलांच्या जन्मानंतर ईशा अंबानी पहिल्यांदाच पतीसोबत मुंबईत परतली आहे. त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
त्याचवेळी मुलांची आजी नीता अंबानी आपल्या नातवाला सांभाळताना दिसल्या.
यावेळी अंबानी कुटुंबाने ढोल-ताशांच्या गजरात ईशा आणि तिच्या जुळ्या मुलांचे भव्य स्वागत केले.
त्याचवेळी आजी नीता अंबानी आपल्या मुलीच्या बाळाला मांडीवर घेऊन अतिशय भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
सोशल मीडियावर हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोंवर सर्वजण अभिनंदन करताना दिसत आहेत.
ईशाने लॉस एंजेलिसमध्ये मुलांना जन्म दिला. त्यानंतर आता ती पहिल्यांदाच पतीसोबत मुंबईत आली आहे.
ईशा अंबानीने आनंद पिरामलबरोबर लग्न केले आहे. हे दोघेही आता एक मुलगा आणि एका मुलीचे पालक झाले आहेत.