Independence Day : तिरंग्यात न्हाऊन निघाली 'मुंबई नगरी'; CSMT, बीएमसी, चौपाटीसह ठिकठिकाणी तिरंगी रोषणाई
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे तिरंगी रंगाची रोषणाई पाहायला मिळाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात CSMT स्थानक तीन रंगात न्हाऊन निघालं आहे.
मुंबई पालिकेच्या इमारतीलाही तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर चर्चगेट रेल्वे स्थानकावरही तिरंगी रोषणाई पाहायला मिळाली.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जेजे रुग्णालय येथे विद्युत रोषणाई करण्यात आली.
राजगृह हे बाबासाहेब आंबेडकरांचं निवासस्थानही राष्ट्रध्वजाच्या तीन रंगात सजलेलं दिसत आहे.
मुख्य टपाल कार्यालयाच्या इमारतीलाही तिरंगी रंगात सजवण्यात आलं आहे.
दादर येथील चैत्यभूमीवरही तिरंगी रंगाची सजावट करण्यात आली आहे.
मुंबईतील प्रसिद्ध गिरगाव चौपाटीही तीन रंगात न्हाऊन निघाली आहे.