First Sunrise of 2023 : स्वप्ननगरी मुंबईतला नववर्षाचा पहिला सूर्योदय, नवी ऊर्जा देणारे सूर्यदर्शन
नव्या वर्षाचा आजचा पहिला दिवस.... हे वर्ष सर्वांना सुखसमृद्धीचं भरभराटीचं जावो या शुभेच्छा आणि आशांसह आजचा सूर्य उगवला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्वप्ननगरी मुंबईतला नववर्षाचा पहिला सूर्योदय तुम्हाला या फोटोमधून पाहायला मिळेल. गुलाबी थंडीमध्ये सूर्यदर्शन खूपच ऊर्जा देणारे आहे.
गुलाबी थंडीमध्ये 2023 या वर्षातील पहिला सुर्योदय पाहण्यासाठी नागरिकांनी सनसेनट पॉईंटवर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
नवीन वर्ष (New Year) सर्वांना सुखाचं आणि समृद्धीचं जावो अशीच सर्वांची इच्छा आहे. नवीन वर्षातील पहिल्या सुर्योदयातून सर्वांना ऊर्जा आणि उत्साह मिळू दे.
नवीन वर्ष सर्वांना सुखाचं आणि समृद्धीचं जावो असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
राज्यावरची सर्व संकट दूर होवोत. प्रलंबित विकास प्रकल्प पूर्ण व्हावेत. हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं आणि समृद्धीचं जावो असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
या नववर्षात सर्वांवरील संकट दूर होवो आणि सर्वांना हे या आल्हायदायी सूर्योदय वर्ष आनंददायी, आल्हायदायी जावो हीच प्रत्येकाची इच्छा आहे.
अनेकांनी नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने केली आहे. नवीन वर्ष सुखासमाधानाचं जावं अशी प्रत्येक जण देवाकडे प्रार्थना करत आहे.
मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर, पुण्यातील दगडूशेठ मंदिर, शिर्डीतील साईबाबा मंदिर, कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर, शेगावातील गजानन महाराज मंदिरात पहाटेपासूनच भक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.