Dadar Chaityabhoomi : चैत्यभूमीवर भरलं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 100 दुर्मिळ चित्रांच प्रदर्शन
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 132 व्या जयंतीनिमित्त मुंबई महानगरपालिकेचं अनोखं अभिवादन
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमी परिसरात भरवलं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळपास 100 दुर्मिळ चित्रांच प्रदर्शन
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ चित्रांमधून अनेक जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कुटुंब, समता सैनिकांसोबत काढलेला फोटोंचा या प्रदर्शनात समावेश आहे.
तसेच मुंबई महानगरपालिकेशी त्यांनी केलेला पत्रव्यवहार यांसारखे अनेक जुने दस्तावेज या चित्र प्रदर्शनात लावण्यात आलेले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन येथील गोलमेज परिषदेत घेतलेल्या सहभागाचा देखिल प्रदर्शनात समावेश आहे.
लंडन येथील गोलमेज परिषदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हा महत्वाच्या फोटोंपैकी एक मानला जातो.