Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO : 'शिवतीर्थ'वर डिनर डिप्लोमसी! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज ठाकरेंची भेट
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळं महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज ठाकरे यांच्या मुंबईतील 'शिवतीर्थ' निवासस्थानी दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली.
मनसेच्या पाडवा मेळाव्यानंतर नितीन गडकरी राज ठाकरेंच्या भेटीला गेल्यामुळे मनसे-भाजपच्या युतीच्या चर्चा रंगल्या आहेत.
पण ही राजकीय भेट नव्हती, तर व्यक्तिगत आणि कौटुंबिक भेट असल्याची गडकरींनी माहिती दिली.
भाजप-मनसे युतीच्या चर्चा सुरु असताना गडकरी आणि राज ठाकरेंची भेट महत्त्वाची मानली जाते.
मुंबईतील शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. राज ठाकरेंच्या या टीकेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांनी समर्थन केले होते.
दरम्यान, या अगोदर काही महिन्यांपूर्वी भाजप नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावेळी देखील मनसे-भाजप युतीच्या चर्चा रंगल्या होत्या.
मात्र, काही मुद्द्यावर एकमत न झाल्यामुळे युतीची चर्चा फिसकटल्याचं म्हटलं जात होतं.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.