CM Eknath Shinde meet Raj Thackeray: सदिच्छेमागचं 'राज' काय? मुख्यमंत्र्यांचं राज ठाकरेंच्या घरी सहकुटुंब स्नेहभोजन
शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीनंतर राज्यातील राजकारण तापलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशातच राज्यात अनेक नवी राजकीय समीकरण जुळून येत असल्याचं पाहायला मिळतंय.
राज्यात काल झालेल्या अशाच एका भेटीनंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची त्यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब भेटीसाठी दाखल झाले होते.
मागील काही दिवसांत झालेल्या घडामोडींच्या संदर्भात देखील कालच्या ठाकरे-शिंदे भेटीची चर्चा होण्याची शक्यता आहे.
एकीकडे मालेगावमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा झाली. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सहकुटुंब मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला उपस्थित राहिल्यामुळे राज्याच्या राजकारणात आणखी एक नवं समीकरण जुळून येणार की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे.
आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये या विषयावर चर्चा होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या जाहीर सभेत एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे आज सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी स्नेहभोजनासाठी पोहचले.
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची पहिली भेट नाही. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि पाडवा मेळाव्यानंतर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट झाली होती. एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची आतापर्यंत सात ते आठ वेळा भेट झाली आहे.