KEM Hospital : मुख्यमंत्र्यांची अचानक KEM रुग्णालयाला भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अचानक रात्री दिली KEM रुग्णालयाला भेट.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेईएम रुग्णालयाला (KEM Hospital Paral) अचानक भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
रुग्णालयातील सामान्य विभागासह अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांशी देखील मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
रुग्णांना मिळत असलेल्या उपचारांची माहितीही त्यांनी घेतली. रुग्णांची कोण कोणत्या बाबतीत गैरसोय होते हेदेखील मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतले.
गेल्या काही दिवसांपासून केईएम रुग्णालयात बंद अवस्थेत असलेले सहा वॉर्डची देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली.
वॉर्ड बंद ठेवण्यामागे नक्की काय कारणे आहेत ते त्यांनी जाणून घेतले. हे विभाग तात्काळ सुरु करण्याचे निर्देशही मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.
रुग्णांना उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करुन देणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून त्यात कोणताही निधी कमी पडू देणार नाही असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
रुग्णांना देण्यात येणाऱ्या दुधाच्या दर्जाबाबत काहींनी प्रश्न उपस्थित केले होते. याबबात रुग्णांना तत्काळ चांगल्या दर्जाचे दूध उपलब्ध करुन द्यावे, असेही निर्देशही पालिकेच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिले. .
रुग्णालयातील सामान्य विभागासह अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांशी देखील मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.