मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपली सुट्टी त्यांच्या मूळ गावी म्हणजेच सातारा जिल्ह्यातील दरे गावात जाऊन साजरी करतात. यावेळी, शेतीची मशागत करण्याचं कामही मुख्यमंत्री करताना सर्वांनी पाहिलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशभरात रक्षाबंधन सण साजरा होत असून राज्यातही पॉलिटकल रक्षाबंधन पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर महिला भगिनींकडून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना राखी बांधून सण साजरा होत आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही वर्षा निवासस्थानी महिला भगिनींकडून राखी बांधून हा सण साजरा केला. यावेळी, त्यांच्या सख्ख्या बहिणीनेही त्यांना राखी बांधली.
रक्षाबंधनाच्या सण साजरा केल्यानंतर मुख्यमंत्री सुट्टीसाठी त्यांच्या मूळ दरे या गावी येणार असल्यामुळे आता त्यांच्या स्वागताच्या तयारीसह नवी कोरी शिवप्रताप बोट सज्ज झाली आहे.
मुख्यमंत्र्यांना तापोळा ते दरे या गावात घेऊन जाण्यासाठी नवी कोरी तराफा बोट सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेने ही बोट नव्याने बनवून घेतली असून जुनी बोट सध्या बामनोली येथील धक्क्यावर लावली आहे.
जुन्या बोटीची वयमर्यादा संपली होती. सध्या जुनी बोट ही शंभर हॉर्सपॉवरची बोट होती. आता ही नवीन बोटीला दोन मशिन असून त्या 160 -160 हॉर्स पॉवरच्या आहेत.
या नव्या बोटीची ताकत वाढली असून यात सुमारे 95 प्रवासी गॅलरीत आणि त्याच्या खाली बसू शकणार आहेत. याचा वेगही पुर्वीच्या बोटपेक्षा जास्त आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच येथील ताफ्यात नव्याने आलेल्या या बोटीमुळे परिसरातील लोकांना देखील सध्या मोठा दिलासा मिळाला आहे.